
पुणे: (प्रतिनिधी) पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर 16 जानेवारीला प्रत्यक्ष मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार एका फेरीसाठी 30 मिनिटांचा वेळ लागेल, ज्यामुळे 16 जानेवारीला सकाळी 11.30 वाजेपर्यंत शहराचा पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
Leave a comment